आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:बायोगॅससाठी 20  लाखांची तरतूद

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापरासाठी प्रदुषण विरहित इंधन म्हणून जिल्ह्यात ४७४ बायोगॅस संयत्र उभारणीचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने घेतले. त्यासाठी शासनास्तरावरून प्रकल्पाच्या आकाराप्रमाणे ९ हजार ८०० ते ७० हजार ४०० अनुदान दिले जाणार आहे. त्यात जिल्हा परिषदेने स्वनिधीतून प्रतिलाभार्थी ४ हजार रूपये अनुदानाची भर घातली आहे. त्यासाठी स्वनिधीतून २० लाखांची तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला शासनाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस संयत्रांची उभारणी केली जाणार आहे. एक घनमिटरसाठी ९ हजार ८०० पासून ते २० ते २५ घनमिटर बायोगॅससाठी ५२ हजार ८०० अनुदान शासन देणार आहे. अनुसुचित जाती, जमातीसाठी एक घनमिटर १७ हजार तर २० ते २५ घनमिटरसाठी ७० हजार ४०० शासकीय अनुदान आहे. जिल्हा परिषद त्यात प्रतिलाभार्थी अधिक ४ हजार देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...