आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील अडीच वर्षात विनयभंगाचे १७६२, तर बलात्काराचे ४४४ पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. यात पोक्सो अंतर्गत ३६३ गुन्हे दाखल असून, बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तब्बल ४६ टक्के पीडीता या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलिस दलाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात दरवर्षी सुमारे २० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अधिकाधिक कठोर कायदे केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात महिला अत्याचाराचे २२०६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी तब्बल ५३३ गुन्हे हे सन २०२२ या वर्षातील आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यात अल्पवयीन पीडितांचे प्रमाण कमी असले, तरी बलात्काराच्या गुन्ह्यात मात्र, ४६ टक्के पीडित या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिस दलाकडून मागील दोन वर्षातील दाखल गुन्ह्यांपैकी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले आहेत. केवळ चार गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. तर चालू वर्षात दाखल असलेल्या ५३३ गुन्ह्यांपैकी २७२ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे.
वेळेत चार्जशीट दाखल होण्याचे प्रमाण वाढले
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षातील महिला अत्याचाराच्या केवळ चार गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहिला आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वेळेत चार्जशीट दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
हाणामारीच्या घटनेतही ‘कलम ३५४’
मुली व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाकडून कठोर कायदे केले जातात या कायद्यांमुळे पिढी त्यांना न्यायही मिळतो. मात्र, अलीकडच्या काळात अनेक वेळा किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल होताना ‘कलम ३५४’ अन्वये गुन्हे दाखल होत आहेत. यातून महिला संरक्षणासाठीच्या या गुन्ह्यांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.