आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा‎:अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार‎ करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा‎

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमीष दाखवून व आत्महत्या करण्याची‎ धमकी देत १४ वर्षीय मुलीला पळवून नेले व तिच्यावर‎ वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला न्यायालयाने‎ दोषी धरले. त्याला २० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड‎ केला आहे. शिवाजी भाऊराव सूर्यवंशी (रा. ब्राम्हणी, ता.‎ राहुरी) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.‎ पॉक्सो कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी मोरे‎ यांनी त्याला दोषी धरून विविध कलमान्वये ही शिक्षा‎ ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी‎ वकील मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

नोव्हेंबर‎ २०२१ मध्ये अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची‎ फिर्याद मुलीच्या काकाने राहुरी पोलिस स्टेशनला दिली‎ होती. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव‎ यांनी केला. पीडित मुलगी सापडल्यानंतर चौकशीत‎ आरोपी शिवाजी सूर्यवंशी याने लग्नाचे आमिष दाखवून‎ पळवून नेल्याचे सांगितले. तसेच, ‘तू माझ्याशी बोलली‎ नाही, तर आत्महत्या करील’ अशी धमकी तो द्यायचा.‎ आरोपी विवाहित असून, त्याने पळवून नेल्यावर‎ अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. या‎ खटल्यात सरकारी वकील मनीषा केळगेंद्रे - शिंदे यांनी‎ काम पाहिले, त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ, तसेच‎ पोलिस कॉन्स्टेबल पठारे व वाघ यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...