आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे 200 कार्यकर्ते भाजपमध्ये

जामखेड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी,एकबुर्जीवस्ती , घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चोंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

राजुरीला राष्ट्रवादीचा मजबुुत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष काळदाते यांनी आपल्या २०० समर्थकांसह भाजपात प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले. आमदार शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, आजीनाथ हजारे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ. अल्ताफ शेख, आप्पासाहेब ढगे उपस्थित होते. राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांच्या भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आमदार शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...