आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय:म्हाडाच्या 40 गाळ्यांतून 200 जणांना मिळेल रोजगार ; गाळ्यांची उद्यापासून विक्री निविदा

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील प्रेमदान चौकात नाशिक गृहनिर्माण- क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या ४० व्यावसायिक गाळ्यांची ९ नोव्हेंबर पासून विक्री निविदा काढण्यात येणार आहे. १२ डिसेंबर या निविदा खुला होणार असून जानेवारीपासून प्रत्यक्षात ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात या व्यवसाय गाळ्यांतून २०० जणांना रोजगार मिळणार आहे.

प्रेमदान चौकात म्हाडाकडून सुरू असलेल्या व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाले आहे.प्रेमदान चौकात तीन इमारती असून, त्यात व्यावसायिक गाळे आहेत. आहे. नगर शहरातील प्रामुख्याने सावेडी उपनगरातील व्यवसायाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणारा असून, प्रकल्पातून छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर बसणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना थेट सुरक्षित व्यवसाय करता येणार आहे.

शहरातील प्रेमदान चौक व एकवीरा चौकात पूर्ण झालेल्या म्हाडाच्या प्रकल्पातून १२१ व्यावसायिक गाळे व कार्यालये सुरू होणार आहेत.दरम्यान, या ४० गाळ्यांसाठी अत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गट यासाठी हे गाळे असणार आहेत. पात्र अपात्र निविदा ठरवल्यनंतर जानेवारी २०२३ मध्ये व्यावसायिकांना गाळे दिले जातील.

निविदा १२ डिसेंबरला खुल्या होणार नगर शहरातील प्रेमदान चौकातील म्हाडाच्या चाळीस व्यावसायिक गाळ्यासाठी ९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत निविदा विक्री होणार आहे. १२ डिसेंबर रोजी स्वीकृती व निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. जी. एन. कडूस, रेंट कलेक्टर

बातम्या आणखी आहेत...