आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतुरता बाप्पाच्या आगमनाची!:चौथी, पाचवीच्या 200 विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा; विवेकानंद स्कूलचा उपक्रम

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या सहा दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे. तारकपूर परिसरातील सेंट विवेकानंद स्कूल मधील विद्यार्थ्यांनी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेश मूर्तीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शाळेतील चौथी व पाचवीच्या 200 विद्यार्थ्यांनी शाडूमातीचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी बनवले. यानिमित्त शाळेत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचे कौतुक

सविता रमेश फिरोदिया शाळेच्या कला शिक्षिका गीतांजली लोटके यांनी सर्व विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शाडूमातीपासून गणपती बनवण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी आकर्षक श्रीगणेश साकारून गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करत ही कार्यशाळेचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित असलेले सिंधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव दामोदर बठेजा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावे हा उद्देश

लहानपणीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी विवेकानंद स्कूलमध्ये कायम विविध प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करत आहोत. ही लहान मुले उद्याची भावी पिढी आहे. त्यांना आत्तापासूनच पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते, असे सचिव बठेजा सांगितले. यावेळी प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका गोदावरी कीर्तनी, अनामिका म्हस्के आदींसह सर्व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेत सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना शाळेकडून शाडूमाती उपलब्ध करून दिली होती.

शाडू मातीच्या मूर्तीला तडे जात नाहीत

शाडूमातीचे गणपती करताना त्यात केवळ शाडू मातीच असते. ती भिजवणे, पाण्यात अधिक मुरू देणे महत्त्वाचे असते. थंड राहणे हा या मातीचा गुणधर्म आहे. त्यामुळे या मातीच्या मूर्तीला तडे जात नाहीत. हल्ली काळ्या मातीचे, इको फ्रेंडली गणपतीदेखील केले जातात. त्यात कागदाच्या लगद्यापासून अन्य काही मिसळले जाते. शाडू मातीत असे काही मिसळले जात नाही. गणपतीचे दात, हात, सोंड, दागिने हे हातानेच करावे लागतात. ते साच्याने करता येत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...