आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढण्याची शक्यता:पारनेर बाजार समितीत कांद्याला 2000 रुपये भाव; रविवारी 3 हजार 637 कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. पारनेर बाजार समितीमध्ये 7 ते 8 लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1600 ते 2000 हजार रुपये भाव मिळाला. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी 3 हजार 637 कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबरच्या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल 1100 ते 11500 रुपये भाव मिळाला.

अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात 1 लाख 90 हजार 529 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादनही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.

शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. पारनेर बाजार समितीमध्ये रविवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस कांद्याचा लिलाव होतो. रविवारी (12 जून) पारनेर बाजार समितीत कांद्यचे लिलाव झाले. यावेळी सुमारे 3 हजार 637 कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यातील 7 ते 8 लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते १५०० रुपये भाव मिळाला.

दुय्यम कांद्याला हा मिळाला भाव

दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते 1000 रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला म्हणजे जोड कांद्याला प्रतिक्विंटल 200 ते 600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...