आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • 214 Animals Died Due To Lumpy In Ahmednagar In 6 Days; 17 Thousand 224 Animals Were Affected In The District; 2 Thousand Animals Recovered After Treatment

अहमदनगरमध्ये 6 दिवसांत लम्पीमुळे 214 जनावरांचा मृत्यू:जिल्ह्यात 17 हजार 224 जनावरांना बाधा; 2 हजार जनावरे उपचारानंतर बरी

दीपक कांबळे | अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी त्वचा रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत नव्याने 2 हजार 940 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे, याच 6 दिवसात तब्बल 214 जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांसह पशुसंवर्धन विभागाची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात 14 लाखापेक्षा अधिक पशुधन असून दैनंदिन दूध उत्पादन 32 लाख लिटरपर्यंत आहे. जिल्ह्यात दूध उत्पादनातून दररोज सुमारे साडेनऊ कोटींची उलाढाल होते. अशा परिस्थितीत लम्पीचा फैलाव नियंत्रणात येत नसल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.

हा रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना तसेच माशा व कीटकांमुळे प्रसारीत होतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांच्या स्थलांतरावर निर्बंध आणून, बाजार बंद केले आहेत. तसेच लसीकरणालाही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 224 जनावरांना लम्पीची बाधा झाली.

27 ऑक्टोबरला बाधित जनावरांची संख्या 14 हजार 284 होती, तर मृत जनावरांचा आकडा 869 होता. मंगळवारी 1 नोव्हेंबरला पशुसंवर्धन विभागाकडून आलेल्या अहवालानुसार बाधित जनावरांचा आकडा 17 हजार 224 वर पोहोचला तर मृत जनावरांचा आकडा 1 हजार 83 झाल्याची नोंद आहे. या सहा दिवसातच नव्याने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या 2 हजार 940 तर मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या 214 झाली आहे.

अहवालातील तारखेनिहाय नोंदी

27 ऑक्टोबर - बाधित 14284, मृत्यू 869

28 ऑक्टोबर - बाधित 15059, मृत्यू 886

29 ऑक्टोबर - बाधित 15460, मृत्यू 955

30 ऑक्टोबर - बाधित 16063, मृत्यू 989

31 ऑक्टोबर - बाधित 16644, मृत्यू 1040

1 नोव्हेंबर - बाधित 17224, मृत्यू 1083

27 नोव्हेंबर ते 1 नोव्हेंबर या काळात जवळपास 214 जनावारांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचे या अहवालातून दिसून येत आहे. तर 2940 जनावरांना नव्याने लम्पीची लागण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

2 हजार जनावरे उपचारानंतर झाली बरी

पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी रोगाचा फायदा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात आहेत. बाधित जनावरांना तात्काळ उपचार मिळत असल्याने आतापर्यंत दोन हजार जनावर बरी झाली आहेत. 27 ऑक्टोबरला बऱ्या झालेल्या जनावरांचा आकडा 8 हजार 480 होता, तर एक नोव्हेंबरला बऱ्या झालेल्या जनावरांचा आकडा 10 हजार 480 वर पोहोचला आहे.

लसीकरण 14 लाख 97 हजार 630

रोगाच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत 14 लाख 97 हजार 630 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...