आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले:आवक वाढल्याने मुळातून नदीपात्रात 2170  क्युसेकने पाण्याचा विसर्ग

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोतुळकडून मुळाधरणात पाण्याची आवक वाढल्याने गुरूवारी दुपारी मुळा धरणाचे ११ दरवाजे २ इंच उंचावून मुळा नदीपात्रात २ हजार १७० क्येसेकने पाणी सोडण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ६५७ दशलक्ष घनफूट झाला होता. मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची गेल्या महिन्याभरातील ही दुसरी वेळ आहे. १४ ऑगस्टला मुळाधरण तांञिकदृष्ट्या भरल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. २७ ऑगस्टपर्यंत धरणातून नदीपात्रात ४ हजार ३३९ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला होता.

कोतुळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक निचांकी झाल्याने २७ ऑगस्टला नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. गुरुवारी दुपारी कोतुळकडुन मुळा धरणात ३ हजार ६१९ क्येसकने तर सायंकाळी ६ वाजता २ हजार ९८४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. गुरुवारी दुपारी धरणातुन मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी १३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ६५७ दशलक्ष घनफूट तर पाण्याच्या पातळीची १८११.४० फूटापर्यंत होती.मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची १९ हजार १९६ दशलक्ष घनफूट तर पाण्याच्या पातळीची १७९९.१० फूटापर्यंत नोंद होती.

बातम्या आणखी आहेत...