आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:223 नदीकाठची गावे पूर प्रवण; मान्सूनच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत नदीकाठच्या गावांना नोटिसा बजावण्याचा निर्णय

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यात २२३ गावे हे पूरप्रणव म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. नदीकाठच्या पूर प्रणव गावांना सतर्कतेसाठी नोटिसा बजावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य मान्सून स्थिती व संभाव्य पूरग्रस्त गावांचा, तसेच केलेल्या उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑनलाईन सादर करण्यात आला आहे. मान्सून पूर्वतयारी आढावा बैठका तालुकानिहाय घेतल्या जात आहेत.

नगर जिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना, खैरी, म्हाळुंगी या नदी काठच्या २२३ गावांना संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन ती गावे पूरप्रणव म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या पूर प्रणव गावांना सतर्कतेसाठी तालुका स्तरावरून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य मान्सून स्थिती व संभाव्य पूरग्रस्त गावांचा, तसेच केलेल्या उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्त गमे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑनलाईन सादर करण्यात आला आहे.

प्रशासनाकडे ७ बोट उपलब्ध
नगर जिल्ह्यात २०२० मध्ये सरासरी ७६७ मिलिमीटर पाऊस आला होता. तर २०२१ मध्ये सरासरी ५६६ मिलिमीटर पाऊस झाला होता. मान्सूनच्या पावसामुळे नद्यांना पूर आल्यानंतर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाययोजना म्हणून प्रशासनाकडे शोध व बचाव कार्यासाठी ७ बोट आहेत. यात ५ रबर बोट व २ फायबर बोट उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...