आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:फळे व भाजीपाला निर्यातीसाठी 2254 शेतकऱ्यांनी केली नोंदणी; निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वर्षभरात तिप्पट वाढ

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यामधील दरवर्षी फळे व भाजीपाला निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सन २०२१-२२ मध्ये सुमारे २२५४ शेतकऱ्यांनी द्राक्षे, आंबा, डाळिंब व भाजीपाला निर्यातीसाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अपेडा अंतर्गत नोंदणी केली. सुमारे १६१६. ४५ हेक्टर क्षेत्र यासाठी नोंदवण्यात आले. २०२०- २१ मध्ये फळे, भाजीपाला निर्यातीसाठी ७१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये आता तिप्पट वाढ झाली आहे.

जिल्ह्यामध्ये विविध फळबागांचे एकूण ७६ हजार १७२ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये डाळिंब पिकाखालील क्षेत्र ३ लाख ७६ हजार ७७ हेक्टर आहे. द्राक्षाचे २७८३ हेक्टर, लिंबू १ लाख २४ हजार ६२ हेक्टर, आंबा पिकाखालील ६ हजार ७५८ हेक्टर क्षेत्र आहे. विविध फळांच्या व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून अपेडा अंतर्गत नोंदणी करावी लागते. सन २०२१- २२ मध्ये ग्रेपनेट अंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी ८७१ शेतकऱ्यांनी ५८७.८७ हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली. मँगोनेट अंतर्गत १०६ शेतकऱ्यांनी १०२.५ हेक्टर क्षेत्रावरील आंब्याच्या निर्यातीसाठी नोंद केली. अनारनेट अंतर्गत १२६९ शेतकऱ्यांनी ९१९.८४ हेक्टर क्षेत्राची डाळिंब निर्यातीसाठी नोंद केली. व्हेजनेट अंतर्गत भाजीपाला निर्यातीसाठी ७ शेतकऱ्यांनी ५.४२ हेक्टर क्षेत्राची नोंद केली. केळी पिकासाठी एका शेतकऱ्यांनी नोंद केली. नगर जिल्ह्यामध्ये विविध फळांच्या निर्यातीसाठी पाथर्डी तालुक्यातील के. बी. एक्सपोर्ट ही एकमेव पॅक हाऊस कंपनी आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा आणखी पॅक हाऊस कंपनीची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आंब्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

निर्यातीसाठी नोंदणीत झाली वाढ
सन २०१८-१९ मध्ये द्राक्ष, आंबा, डाळिंब फळांच्या निर्यातीसाठी ६३७ शेतकऱ्यांनी ५०७.७७ हेक्टर क्षेत्राची नोंद केली होती. २०१९- २० मध्ये यात झाल्याचे दिसून आले. या वर्षात ५०० शेतकऱ्यांनी ३५३.३७ हेक्टर क्षेत्राची नोंद केली. २०२१-२१ मध्ये यात वाढ झाली असून फळे भाजीपाला निर्यातीसाठी ७१३ शेतकऱ्यांनी ४९९.७९ हेक्टर क्षेत्राची नोंद केली होती. सन २०२१-२२ मध्ये २२५४ शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाला निर्यातीसाठी १६१६.४५ हेक्टर क्षेत्राची नोंद केली. ''
रवींद्र माने, कृषी उपसंचालक, अहमदनगर.

जिल्ह्यातून आंब्याची निर्यातही वाढली
अहमदनगर जिल्ह्यातून चालू हंगामात सुमारे ३५० टन आंब्याची विविध देशांत निर्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १०६ शेतकऱ्यांनी अपेडा अंतर्गत २०२१- २२ या वर्षात मँगोनेटद्वारे १०२ हेक्टरवरील आंबा निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली होती. या अंतर्गत आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...