आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:एकाच चोराकडून तब्बल 23 दुचाकी हस्तगत; तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून एक, दोन नव्हे तर तब्बल २३ दुचाकी चोरल्याची कबुली दुचाकी चोराने तपासात दिली आहे. तोफखाना पोलिसांनी सुमारे १६ लाख रुपये किमतीच्या या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना चोरी सुरु केल्याचे समोर आले आहे.

नगर शहर, उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. किसन ऊर्फ कृष्णा पोपट सापते (वय २६, रा. खकाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुरुवातीला आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. किसन सापते हा वाहन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करत होता. त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने ७० ते ८० हजार रूपये किंमतीला विक्री केली होती. पोलिस तपासात त्याने २३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.

२८ एप्रिल रोजी दुपारी किसन सापते याने प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील भानुदास सरोदे यांची बुलेट दुचाकी चोरली होती. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सापते याला समजल्याने त्याने सरोदे यांची दुचाकी भिंगारमध्ये सोडून तो पसार झाला होता. तेव्हापासून तोफखाना पोलिस त्याच्या मागावर होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांच्या पथकातील उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाठ, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसिम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना शैलेश गोमसाळे, पोकॉ सतिष त्रिभुवन, पोकॉ शिरष तरटे, पोकॉ सचिन जगताप, पोकॉ धिरज खंडागळे, पोकॉ चेतन मोहिते, पोकॉ गौतम सातपुते, पोकॉ अतुल कोतकर, पोकॉ प्रशांत राठोड यांनी आरोपी सापते याला बीड जिल्ह्यातून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...