आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र नेवासे तालुक्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे. रॅपिड अँन्टीजन तपासणीत तामसवाडी गावात १९ रुग्ण आढळल्याने या रुग्णांसह आणखी चार रुग्णांना टेम्पोत कोंबून भेंडे (ता. नेवासे) येथील कोविड सेंटरला दाखल केले. तब्बल २५ किमीचा हा प्रवास रुग्णांसह नागरिकांना धोकादायक ठरणारा ठरला. या रुग्णांनी भेंडेकडे प्रवास सुरू असतानाच काही ठिकाणी काही वस्त्ू व सामानांची खरेदीही केली.भेंडे येथील काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या टेम्पो चालकास विचारणा केली असता आम्ही वाहन सॅनिटाईझ करून रुग्णांना बसवल्याचे सांगितले. दरम्यान, उपकेंद्रास वाहन नसल्याने काहींनी आरोग्य विभागाच्या परस्पर खासगी वाहनांतून रुग्ण नेण्याचा निर्णय घेतला.
कर्तव्य भावनेतून मदत
यापूर्वीचे रुग्ण आम्ही आमच्या स्वत:च्या वाहनांत सेंटरला नेले. परंतु एकाच वेळी रुग्ण संख्या वाढल्याने व आरोग्य उपकेंद्राकडे वाहन नसल्याने गावकऱ्यांनी मोठ्या वाहनाने रुग्ण कोविड सेंटरला पाठवले कर्तव्यभावनेतून हे काम गावकऱ्यांनी केले तसेच कोविड सेंटर पर्यंत आम्ही सर्व रुग्णांची काळजी घेतली. ' देवीदास जगताप, ग्रामस्थ, तामसवाडी.
ग्रामस्थांनी रुग्णांना घाईने टेम्पोतून नेले
तालुक्यात आरोग्य कर्मचारी,अधिकारी जीव धोक्यात घालून कोरोनाला आळा घालण्यासाठी,प्रतिबंधासाठी लढत आहेत. तालुक्यातील ९ पैकी ७ उपक्रेंदांना वाहने आहेत. नेवासेखुर्द व टोका उपकेंद्रास मात्र वाहन नाही.तामसवाडीतील रुग्णांसाठी आरोग्य विभागाकडून वाहन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच काहींनी घाईने टेम्पोतून रूग्ण नेले.'' अभिराज सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, नेवासे.
२३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही सामान्यांच्या जीवाशी खेळ
या रुग्णांनी भेंडे येथे दुकानातून साहित्य खरेदी केले. तामसवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून तलाठी व ग्रामसेवक येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.