आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांमध्ये संभ्रमावस्था:महसूलच्या कारवाईनंतर तब्बल 24 दिवसांनी मिंडा ला नोटीस

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपा औद्योगिक वसाहतीत ५०० कोटीची गुंतवणूक असलेल्या मिंडा या आंतरराष्ट्रीय उद्योगाला महसूल विभागाने कारवाईनंतर तब्बल २४ दिवसांनी दंडात्मक कारवाईची नोटीस दिली. नोटीसीवर ३ नोव्हेंबरची तारीख असताना ती २२ नोव्हेंबरला दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सुपा औद्योगिक वसाहतीतील मिंडा या कारखान्यासमोर असलेल्या रस्त्याच्या कारखान्याच्या मध्यभागी असलेला मुरूम काढून त्याची लेव्हल केली जात होती.

अधिकृत परवानगी या कंपनीने घेतली होती. तहसीलदारांनी मुरूम खनन सुरू असताना वाहन ताब्यात घेतले होते. ही कारवाई २६ ऑक्टोबरला तहसीलदारांनी केली होती. कारवाईनंतर महसूलने वाहन चालकाच्या नावे दंडात्मक कारवाईची नोटीस मंगळवारी पाठवली.

विशेष म्हणजे या नोटीसीवर ३ नोव्हेंबरची तारीख आहे. २४ दिवसांनी ही दंडात्मक कारवाईची नोटीस बजावून. २ लाख ३३ हजारांचा दंड ठोठावला. ही कारवाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीतील भूखंड गौण खनिज उत्खननात येत नाहीत. तरीही महसूल प्रशासनाने कारवाई करून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान वाहतुकीचा परवाना नसल्याचे कारण नोटीसीत दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...