आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आयडी व पासवर्डचा गैरवापर करुन बँकेतील खात्यातून काढले 24 लाख 55 हजार रुपये

श्रीरामपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चांदेगाव शाखेतील शाखाधिकारी कम क्लर्कने युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करुन तीन खातेदारांच्या खात्यातून २४ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी याशाखेच्या शाखाधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदेगाव येथील अहमदनगर जिल्हा बॅकेच्या शाखेचे खातेदार नाना आनंदा भोर यांनी त्यांच्या खात्यात पैशाचा अपहार झाला असल्याची तक्रार मुख्य कार्यालयात केली होती.

त्यानुसार अहमदनगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाने चांदेगाव या जिल्हा बँकेच्या शाखेची अंतर्गत तपासणी करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे तपासणीस रवींद्र कारभारी बिडवे (रा. चौधरी वस्ती, वॉर्ड नं. ७) यांना दिले. त्यानुसार अंतर्गत तपासणीस रवींद्र बिडवे व मदतनीस संजय वसंत लावर या दोघांनी चांदेगाव जिल्हा बँक शाखेची अंतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये १ जानेवारी २०१९ ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत या शाखेतील खातेदार नाना आनंदा भोर यांच्या बचत खात्यातून २३ लाख रुपये परस्पर काढल्याची बाब समोर आली आहे.

तसेच अशोक सखाहरी खर्डे यांच्या वैयक्तिक बँक खात्यातून ८० हजार रुपये तसेच जिरीजाबाई अशोक खर्डे यांच्या वैयक्तीक खात्यातून ७५ हजार रुपये असे एकूण तीन खातेदारांच्या खात्यातून २४ लाख ५५ हजार रुपयाचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी कॅशियर कम क्लर्क राजेंद्र मधुकर लचके(रा. संगमनेररोड, प्राथमिक बँकेशेजारी, श्रीरामपूर) बँकेच्या विड्रॉल स्लीपचा व शाखेतील इतर कर्मचारी यांचा व स्वतःचा युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करुन या तीन खातेदारांच्या खात्यातून रकमेचा अपहार केला असल्याचे तपासणीत आढळून आले.

शाखाधिकारी राजेंद्र मधुकर लचके यांनी लेखी जबाबात या रकमेचा अपहार आपणच केला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी जिल्हा बँकेचे तपासणीस रवींद्र कारभारी बिडवे यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...