आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार विखेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:शहरातील रस्त्यांसाठी 25 कोटींची मागणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडीसह अपघात घडत आहेत. शहर खड्डे मुक्त करण्यासाठी रस्त्याच्या कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, सावेडी नाक्यावरील सावेडी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

खासदार विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधीची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार विखे यांना दिले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर शहराच्या स्तारीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केल्याबद्दल खासदार विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...