आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीय पंथीय:हरवलेल्या नगरसेवकांना शोधून देणाऱ्यांना 25 पैसे रोख बक्षीस ; टाळ्या वाजवा आंदोलन करणार

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारकपूर भागातील प्रभाग चारमध्ये सिंधी कॉलनी येथे ३० ते ४० तृतीयपंथी कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. त्यांना मनपाच्या नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे निवेदन तृतीयपंथी कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष काजल गुरु यांनी मनपा आयुक्तांना दिले. तसेच, नगरसेवकांना शोधून देणाऱ्यास २५ पैसे रोख बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी रिटा, सना, साधना आदींसह तृतीयपंथी उपस्थित होते. नागरी समस्यांमुळे तृतीयपंथीयांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. वेळेवर साफसफाई होत नाही. चेंबर तुंबलेले आहेत. पाणी मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत. प्रभागातील नगरसेवकांना संपर्क साधला असता ते दुर्लक्ष करत आहेत. या प्रभागातील नगरसेवकांना शोधून दिल्यास २५ पैसे बक्षीस रोख स्वरुपात दिले जाईल, असेही काजल गुरु यांनी म्हटले आहे. येत्या सात दिवसांत समस्या न सोडविल्यास मनपा कार्यालयात टाळ्या वाजवा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...