आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे 25 नोव्हेंबर चक्काजाम आंदोलन:एकरकमी एफआरपी देण्याचीही मागणी- रवींद्र मोरे

अहमदनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीसह अधिक दोनशे रुपये मिळावे तसेच महाविकास आघाडी सरकारने केलेले दोन तुकड्यातील एफआरपीचा कायदा बदलून एक रकमी एफआरपी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

मोरे म्हणाले, आम्ही महिनाभरापासून राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. तसेच केंद्र व राज्य सरकारकडेही पाठपुरावा करत आहोत. मात्र दोन्ही सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरसह राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

या आहेत मागण्या

एक रकमी एफआरपी मिळणे, साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीत दाखवलेल्या भरमसाठ खर्चाचे ऑडिट करावे व तेवढीच रक्कम एफआरपीतून वजा करावी. काटा मारीत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी संगणकीकृत ऑनलाईन वजन काटे बसवण्याचे धोरण जाहीर करावे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळामार्फत साखर कारखाने अथवा वाहनधारकांना मजूर पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करावे, केंद्र सरकारने साखरेची किंमत साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल करावी तसेच इथेनाॅलच्या खरेदीची किंमत प्रति लिटर पाच रुपयांनी वाढवावी तसेच केंद्र सरकारने ऊसदर नियंत्रण अध्यादेशात दुरुस्ती करून एफआरपी ठरवण्याचे सूत्र नव्याने तयार करावे या मागण्या आहेत.

नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नगर मनमाड हायवे जवळ सकाळी साडेदहा वाजता चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...