आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई:26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; संशयितावर गुन्हा दाखल

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी व वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करुन 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

पहाटे कारवाई

सदरील ही कारवाई प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शनिवारी पहाटे 6.00 वाजता शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रात केली. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन मच्छिंद्र काकडे यांच्या फिर्यादीवरुन अश्पाक सुलेमान शेख ( रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव ) व गणेश चंद्रकांत केदार ( रा. लोळेगाव ता. शेवगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

काकडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना खरडगाव येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पहाटे 6.00 वाजता मिटके यांनी पथकासह नानी नदीपात्रात जावून पाहणी केली असता तेथे एक पिवळया रंगाचा विना क्रमांकाचा जेसीबी अश्याप सुलेमान शेख हा वाळू उपसा करताना आढळून आला. तर गणेश चंद्रकांत केदार हा विनाक्रमांकाचा एक आकाशी रंगाचा डम्परमध्ये तीन ब्रास वाळू घेऊन निघाला होता. त्याच वेळी पथकाने शेख, केदार यांच्यासह 20 लाख रुपये किमतीचा जेसीबी व 6 लाख 15 हजार रुपये किमतीचा डंम्पर असा एकूण 26 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी शेख व केदार यांच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ए. एल. भाटेवाल, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उकीर्डे यांच्या पथकाने केली.

रस्त्यांची दुरावस्था

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे आवाज वाळू उपसा करणाऱ्या वाहतूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांना मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...