आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पणन महासंघाच्या वतीने नाफेड अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा खरेदी सुरू आहे. नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात 84 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली होती. या वर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चालू हंगामात 26 हजार 623 क्विंटल हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यात आली. पणन महासंघाच्या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे.
जिल्हा पणन महासंघाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यात नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल 5 हजार 230 रुपये या हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. हरभरा खरेदीसाठी पणन महासंघाकडून जिल्ह्यात 8 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या आठ खरेदी केंद्रावर सध्या शेतकऱ्यांकडून नाफेड अंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदी सुरू आहे.
यामध्ये शेवगाव तालुक्यात 11 हजार 35 क्विंटल 96 किलो, कर्जत येथील खरेदी केंद्रावर 4 हजार 366 क्विंटल 30 किलो, अहमदनगर येथील केंद्रावर2149.60 क्विंटल, पारनेरमध्ये 334 क्विंटल, पाथर्डीत 6 हजार 361 क्विंटल, राहुरीत 975 क्विंटल, श्रीगोंदे 1236.50 क्विंटल, कोपरगावमध्ये 166 क्विंटल असे एकूण 26 हजार 624.36 क्विंटल जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्यात आली.
राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्र सरकारने 7 लाख 76 हजार 460 टन हरभरा खरेदीचे सुधारित उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने 30 मे2022 च्या पत्रान्वये राज्य सरकारला यासंदर्भात कळवले असून 18 जूनपर्यंत हरभरा खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
यंदा चांगले उत्पादन
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले. जिल्हा पणन महासंघाच्या वतीने नाफेड अंतर्गत जिल्ह्यात सध्या आठ खरेदी केंद्रावर हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू आहे. 18 जूनपर्यंत हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळाली. केंद्राचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ही केंद्र बंद होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन संबंधित खरेदी केंद्रावर आपला हरभरा आणून विक्री करावी, असे पणन महासंघाचे जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.