आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० डिसेंबरला निवडणूक:शहर वकील संघटनेच्या तेरा जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर वकील संघटनेच्या कार्यकारणीच्या १३ जागांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूकीसाठी २० डिसेंबरला सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० दरम्यान मतदान होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. लक्ष्मण गोरे यांनी ही माहिती दिली. निवडणुकीसाठी एकूण १७७९ मतदार आहेत. प्रत्येक मतदाराला एकूण १३ मते द्यायची आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, महिला सहसचिव, महिला कार्यकारणी सदस्य यासाठी प्रत्येकी १ तर पुरुष कार्यकारणी सदस्यासाठी ६ मते द्यायची आहेत.

मतदान प्रक्रिया जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील महिला वकील कक्षात पार पडणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज (मंगळवारी) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी दुपारी १२ ते सायंकाळी ४.३० दरम्यान आहे. कार्यकारणीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज - अध्यक्ष - स्वाती शामराव पाटील, संजय पाटील व सुनील सूर्यवंशी. उपाध्यक्ष - अजित वाडेकर, राजाभाऊ शिर्के, भगवान कुंभकर्ण व अनुराधा येवले. सचिव - गौरव दांगट व प्रवीण पालवे. सहसचिव - अजिंक्य काळे व महेश शिंदे.

खजिनदार - सुनील तोडकर व शिवाजी शिरसाठ. महिला सहसचिव - सरिता शेषराव साबळे (कोठारी), आरती गायकवाड व आशा बाळू गोंधळे. महिला कार्यकारणी सदस्य - प्रिया अरुण जगताप व प्रणाली विनोद भुयार. पुरुष कार्यकारणी सदस्य - नितीन खैरे, अभिजीत पुप्पाल, विशाल पठारे, रामेश्वर कराळे, रोहित कळमकर, बेग आयाज अहमद रफीक, रावसाहेब चौधरी, सुदाम साठे व सुदाम गवते.

बातम्या आणखी आहेत...