आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील पाचवीचा निकाल २७.१९ टक्के तर आठवीचा निकाल १३.२३ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला आहे.राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने ३१ जुलैला पूर्व प्राथमिक पाचवी व माध्यमिक विभागातील आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
पाचवीतील ३० हजार २९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ८ हजार २३६ विद्यार्थी पास झाले. तर आठवीतील १८ हजार ८२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २ हजार ४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागीलवर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल १५.७२ तर आठवीचा निकाल ११.४३ टक्के लागला होता. हा टक्का यंदा काही प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थी उत्तीण होण्याच्या संख्येत अहमदनगर राज्याततिसऱ्या स्थानावर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
गुणपडताळणीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
विद्याद्यार्थ्यांना गुणांची पडतालणी करून घ्यायची असल्यास शाळांच्या लॉग ईनमध्ये ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पुनर्रपडताळणीसाठी प्रती पेपर ५० रूपये शुल्काचा भरणा ऑनलाईन करावा लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.