आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काहींनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दोन स्वतंत्र गटात दाखल केले आहेत. सत्ताधारी पॅनेलच्या १५ उमेदवारांव्यतिरिक्त अन्य १३ उमेदवारच रिंगणात आहेत. सत्ताधारी पॅनलच्या काहींनी व त्यांच्या मुलांनी दोन गटात अर्ज भरले आहेत.
बँकेच्या १५ जागांसाठी ११ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सुमारे १० हजारावर सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ९ नोव्हेंबरला संपली. उमेदवारी माघारीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात कोण माघार घेतो व निवडणूक बिनविरोध होते की नाही, याकडे लक्ष आहे.
बँकेच्या १० जागा सर्वसाधारण गटासाठी असून, या गटात बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष गुंदेचा, संजय घुले, प्रा. सुजित बेडेकर, सीए गिरीश घैसास, शिवाजी कदम, अशोक कानडे, डॉ. विजयकुमार भंडारी, निखिल नहार, जयंत येलूलकर, प्रा. माणिक विधाते व भूषण अनभुले, दिलीप अडगटला, अनिल चुडीवाला, गणेश विधे व रवींद्र औटी आदी उमेदवार आहेत. महिला राखीवच्या दोन जागांसाठी रेश्माआठरे-चव्हाण, स्वाती प्रमोद कांबळे, नयना मंदार अडगटला यांचे अर्ज आहेत.
पाच नवे चेहरे रिंगणात
सत्ताधारी पॅनलकडून पाच नवे चेहरे देण्यात आले आहेत. जयंत येलूलकर यांना यंदा पुन्हा पॅनलमध्ये घेतले आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या पत्नी स्वाती कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय दिवंगत संचालक डॉ. अनभुले यांचे चिरंजीव भूषण अनभुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, निखील नहार यांना सर्वसाधारण गटातून व भिंगार येथील प्रदीपकुमार जाधव यांना मागासवर्गीय गटातून सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.