आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुळा पाटबंधारे विभागाने २० हजारांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या ९६ शेतकऱ्यांना सुमारे २९ लाख ८० हजार रुपयांच्या वसुलीपोटी नोटिसा बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास नोटिसीत शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा शेती समृद्ध असला, तरी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला समाधानकारक भाव मिळत नाही. १ नंबर कांद्याला ८ ते १० रुपये, तर तीन नंबर कांद्याला १ रुपया ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. कांद्याचे कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे.
अशातच सिंचनाच्या पाणीपट्टीची थकबाकी मानगुटीवर बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जलसंपदा विभागाने १० नोव्हेंबर २०२१ रोजी एक परिपत्रक काढून २० हजारापेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आकारणीचा बोजा चढवण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशांचा संदर्भ देत, जलसंपदा विभागाने १३ डिसेंबर २०२२ रोजी नाशिक, अहमदनगर, मुळा, पालखेड, मालेगाव पाटबंधारे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानंतर मुळा पाटंबधारे विभागाने शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात असे ९६ थकबाकीदार शेतकरी आहेत. राहुरी, घोडेगाव या उपविभागात २० हजारावरील शेतकऱ्यांकडे थकबाकी नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली.
कोणत्या नियमानुसार कारवाई?
महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ मधील प्रकरण पाच मधील भाग ८ त्यातील परिच्छेद ८८ (१) नुसार पाणीपट्टी वसूल न झाल्यास वाढीव दराने आकारणी करणे तसेच परिच्छेद ८८ (२) नुसार भरणा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार थकबाकी जमीन महसूल थकबाकी मानली जाईल, अशी तरतूद असल्याचे १० नोव्हेंबर २०२१ च्या शासनाच्या परीपत्रात म्हटले आहे.
बहुतांश थकबाकी २००५ पूर्वीची?
जिल्ह्यात २००५ नंतर पाणीवापर संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यापूर्वी सिंचनासाठी वैयक्तीक लाभार्थी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे २० हजारांवर पाणीपट्टी थकीत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २७९ पाणीवापर संस्था आहेत. यापैकी काही संस्थांकडेही पाणीपट्टी थकीत आहे. मार्च अखेर असल्याने वसुलीसाठी जलसंपदा विभाग अॅक्शन मोडवर आहे. दरम्यान, नुना सात नुसार ५५ हजार ९३२ शेतकऱ्यांकडे सुमारे ५ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे.
मुळा विभागाची शेतकरी संख्या व थकबाकी
नेवासे उपविभाग: वडाळा ७५ शेतकरी, थकबाकी - २३१५३५९ नेवासे १ -१५ शेतकरी, थकबाकी ३६१२२३, नेवासे २ - ४ शेतकरी, थकबाकी १४७९८ खडका - १२ शेतकरी, थकबाकी ४९३७६ चिलेखनवाडी, कुकाणा उपविभाग : शिरसगाव १- शेतकरी ३, थकबाकी २५५९३ , शिरसगाव २ - शेतकरी १, थकबाकी ६२४२७ अमरापूर उपविभाग : देडगाव - शेतकरी १, थकबाकी २५२८७ , राहुरी व घोडेगाव उपविभागात शेतकऱ्यांकडे २० हजारांवरील बाकी नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.