आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा:गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 29.17 कोटी रुपयांच्या निविदा

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार असताना आमदार आशुतोष काळे यांनी तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी निधी रुपये मंजूर करून घेतला. त्यापैकी आजपर्यंत ७२ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. पहिल्या टप्यातील ३६ कोटींची दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २९.१७ कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ब्रिटीश काळात निर्मिती झालेल्या गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे १०० वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून त्याचा परिणाम सिंचनावर व कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या विविध पाणी पुरवठा योजनांवर होत होता. गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वारंवार कालवे फुटत होते व पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नव्हते. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते त्यामुळे कालवे दुरुस्तीचा विषय ऐरणीवर होता.

आमदार काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे वचन दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला आहे.आता लवकरच उर्वरित निविदांना मंजुरी मिळून डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने होण्यास मदत होईल. तसेच लाभधारक शेतकऱ्यांच्या व आवर्तनावर असणाऱ्या असंख्य पाणी पुरवठा योजनांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...