आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरचे नरभक्षक:15 दिवसांत 3 चिमुकल्यांना खाल्ले, सर्वांना मारण्याची पद्धत एकच! नगरच्या पाथर्डी तालुक्यात गावकऱ्यांमध्ये दहशत

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सार्थक
  • बीड जिल्ह्यात पकडलेल्या 5 बिबट्यांना माणिकदौंडी घाटात सोडल्याचा संशय

मढी-शिरापूर गावात गुरुवारी रात्री एका 4 वर्षीय मुलाला बिबट्या घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली. रात्रभर शोधल्यानंतर शुक्रवारी सकाळी सार्थकचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. लहान मुलांवर बिबट्याच्या हल्ल्याची मागील 15 दिवसातील ही तिसरी घटना आहे. सर्व घटनेत रात्री मुले गायब होतात आणि सकाळी छिन्नविछीन्न अवस्थेत सापडतात. या सर्व घटनांमुळे पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

श्रेया
श्रेया

जेवण करत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने नेले

पाथर्डी तालुक्यातील मढीमध्ये 15 ऑक्टोबरला रात्री 8 वाजेच्या सुमारास आजोबा आपल्या 3 वर्षीय श्रेयाला आपल्या हाताने जेवण भरवत होते. यादरम्यान अचानक बिबट्या अंगणात आणि काही कळायच्या आत चिमुकलीला घेऊन गेला. श्रेयावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण गावात एकच गोंधळ माजला. गावातील लोक आणि वन्य अधिकाऱ्यांनी रात्रभर श्रेयाचा शोध घेतला, पण अंधारामुळे ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावर श्रेयाचा अर्धा खाल्लेला मृतदेह सापडला. या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच शेजारील वस्तीत एका उषा नावाच्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. उषा यांचा आवाज ऐकून लोक गोळा झाले, त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. असे म्हटले जात आहे की, तोच बिबट्या श्रेयाला घेऊन गेला.

सक्षम
सक्षम

दसऱ्यादिवशी आजोबाच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला घेऊन गेला बिबट्या

15 ऑक्टोबरच्या घटनेनंतर पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावात बिबट्याने दहशत माजवली. दसऱ्यादिवशी 8 वर्षीय सक्षम आपल्या आजोबासोबत अंगनात झोपला होता. यादरम्यान बिबट्या घरात घुसला आणि सक्षमला घेऊन गेला. श्रेयाप्रमाणेच त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला.

मणिकदौंडी, केलवंडी गावातील लोकांचे म्हणने आहे की, बीड जिल्ह्यात पडकलेले 5 बिबटे मणिकदौंडी घाटात सोडण्यात आले होत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहिती आहे. पाथर्डी तालुक्यातही यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, या नरभक्षक बिबट्यांना पकडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील वन अधिकारी विवेक देसाई यांच्या नेतृत्वात 12 जणांचे पथक बोलवण्यात आले आहे. पाथर्डी वनविभागाच्या मदतीने कर्जत, जमखेड, श्रीगोंदा वन विभागातील 15 कर्मचारी त्यांची मदत करत आहेत.