आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:साईंच्या झोळीत 8 दिवसांत 3 कोटी 9.83 लाखांचे दान, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत 48 हजार भक्तांचे दर्शन

शिर्डी / नवनाथ दिघे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल आठ महिन्यांनंतर शिर्डी येथील श्रीसाईबाबांचे मंदिर भाविकांसाठी खुले झालेले आहे. १६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. या काळात साईभक्तांकडून विविध प्रकारे ३ कोटी ९ लाख ८३,१४८ रुपये देणगी साईसंस्थानला प्राप्त झाली आहे.

भाविकांनी टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाइन या सेवांचा लाभ घेतला. ऑनलाइन व सशुल्क दर्शन/आरती पासेसद्वारे ६१ लाख ४,६०० रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच या कालावधीमध्ये शिर्डीतील साई प्रसादालयात सुमारे ८० हजार भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.

मंदिराला अशा मिळाल्या देणग्या
- रोखीत ३ कोटी ९ लाख ८३,१४८ रुपये
- दक्षिणापेटीत १ कोटी ५२ लाख ५७,१०२
- देणगी काउंटरवर ३३ लाख ६,६३२ रुपये
- डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन, चेक,डीडी, मनीऑर्डर आदींद्वारे १ कोटी २२ लाख ५०,८२२ रुपये
- ६ देशांचे परकीय चलन अंदाजे १ लाख ६८,५९२ रुपये
- ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्थानला देणगी मिळाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser