आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवरील व्यक्तीने एका नोकरदाराला अकाउंट सेविंग व सेफ डिपॉझिट लॉकर संदर्भात माहिती देतो, असे म्हणून व्हॉटसअॅपवर पाठविलेल्या एका लिंकवर वैयक्तीक माहिती भरण्यास सांगितली.
माहिती भरल्यानंतर त्या नोकरदाराच्या दोन बँक खात्यातून एकूण दोन लाख ९८ हजार रूपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश शंकरराव कळसे (वय ५५ रा. एकनाथनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.