आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:यतीमखाना वसतिगृहातून 3 अल्पवयीन मुले पळवली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील यतीमखाना वसतिगृहातून तीन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृह अधीक्षक गुफरान रफिक शेख (रा. मुन्सीपल हाडको, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.जुन्या मनपासमोरील यतीमखाना वसतिगृहात मागील दोन वर्षापासून कामटीपुरा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील दोघे व सिध्दार्थनगर, शिरूर (ता. शिरूर, पुणे) येथील एक अशी तीन अल्पवयीन मुले शिक्षणाकरीता राहत आहे.

बुधवारी सायंकाळी क्लास संपल्यानंतर वसतिगृहामध्ये जेवण होते. त्यावेळी वसतिगृहातील इतर मुले जेवण करण्यासाठी हजर होती. मात्र तीन मुले हजर नसल्याने अधीक्षक शेख यांनी त्या मुलांचा शोध घेतला. अधीक्षक शेख यांनी मुलांच्या पालकांना फोन करून मुलांबाबत विचारले असता त्यांनी मुले घरी आली नसल्याचे सांगितले. मुले न सापडल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...