आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात नव्याने ३० एसटी बसगाड्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी ६३८ बस उपलब्ध असून दररोज सुमारे ७० लाखांचे उत्पन्न एकट्या अहमदनगर विभागाला मिळत आहे. सरकारने महिलाच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत दिल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. महिला प्रवाशांच्या सवलतीची रक्कम शासनाकडून राज्यपरिवहन महामंडळाला प्राप्त होते.
महिला प्रवासापोटी एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दरमहा सुमारे ५ कोटीपर्यंत उत्पन्न मिळते आहे. दररोज मिळणाऱ्या एकुण ७० लाखांच्या उत्पन्नापैकी महिला प्रवासापोटी सुमारे २० ते ३० लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे. सण, उत्सव, यात्रा आदी हंगामानुसार उत्पन्नाचा आकडा कमी-अधिक होतो. त्यातच नव्याने ३० एसटी बस दाखल झाल्या असल्याने उत्पन्न वाढीसही त्याचा फायदा झाला आहे. ३० पैकी २० बस तारकपूर आगारात तर १० गाड्या संगमनेर आगाराला देण्यात आल्या आहेत. एसटीच्या अमृत महोत्सवानिमित्त पहिली इलेक्ट्रिक बस जूनमध्ये नगर ते पुणे धावली होती. परंतु, चार्जिंग पॉइंटच्या अडचणींमुळे इलेक्ट्रिक शिवाई बस, पुणे विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध ६३८ बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. कोरोना कालावधी बंद झालेल्या बहुतांश भागात ग्रामीण फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.