आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • 30 Thousand Crore Works In Ahmednagar District; The City District Will Appear On The Map Of The Country; Union Transport Minister Nitin Gadkari Believes

अहमदनगरमध्ये 30 हजार कोटीची कामे:जिल्हा देशाच्या नकाशावर येईल; केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात 30 हजार कोटीची कामे होणार आहेत. अहमदनगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्हा देशाच्या नकाशावर येईल असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (19 नोव्हेंबर)ला व्यक्त केला.

अहमदनगर शहरातील तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे डिजिटल उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होती. यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ.सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर रोहिणी शेंडगे,आमदार राम शिंदे, संग्राम जगताप, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी प्रफुल्ल दिवाण, मिलिंद वाबळे आदी यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, अहमदनगर शहरातील उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. तत्कालीन खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांनी या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला. त्यांच्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे यांनी मागे लागून या कामासाठी पाठपुरावा केला. अनेक अडचणी होत्या त्यावर मात करत उड्डाणपूल सुरू झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात पूर्वी 202 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते आता ते 869 किलोमीटरचे झाले आहेत त्यात तब्बल 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत 13 कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित कामे 17 हजार 228 कोटींची आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 30 हजार कोटींची कामे होणार आहेत.

मुंबई- दिल्ली ग्रीन कॉरिडोरमुळे उत्तर व दक्षिण भारतातील येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. 80 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. पुणे- नगर -औरंगाबाद एक्सप्रेसमुळे औरंगाबाद हुन पुण्याला अडीच तासात जाता येणार आहे येणार आहे. असे गडकरी यांनी सांगितले. नागपूरहून पुण्याला साडेसात तासात जाता येणार आहे. सध्याचा औरंगाबाद पुणे रस्त्या दरम्यान वाघोली व अन्य परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे 56 किलोमीटरचा 18 लेनचा हा रस्ता केला जाणार आहे. पुणे बेंगलोरचे काम सुरू असून 42 हजार कोटीचे हे काम आहे. त्यामुळे नगरहून सहा तासात बेंगलोरला जाता येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. साखर कारखानदारांनी साखर कमी करून इथेनॉल निर्मिती वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी अन्नदाता होण्याबरोबरच ऊर्जा दाता देखील बनला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

.

बातम्या आणखी आहेत...