आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठा:भंडारदरा धरणात 32 टक्के; “मुळा’त 35 टक्के पाणीसाठा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली असून, आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ३२ टक्के तर मुळा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या व सर्वाधिक क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा घट झाली असून, या धरणात ९ हजार २३२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात ३ हजार ६१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. निळवंडे धरणात २ हजार ८४६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.आढळा धरणात ४३६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

नगर जिल्ह्यात असलेल्या प्रमुख १३ धरणातील एकूण पाणीसाठा ३५ टक्के आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये २५ टक्‍क्‍यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली होती. ने पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कालवे आता बंद करण्यात आली आहेत. भंडारदरा धरणातून सध्या प्रवरा नदीपात्रात ८०२ क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. तर कर्जतसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीना धरणातून पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले अाहे. या धरणात सध्या ५२७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

बातम्या आणखी आहेत...