आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव कायम असून जवळपास ३७१ जनावरे दगावली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. पोखरी बाळेश्वर येथे ५२ जनावरे दगावली असून हि तालुक्यातील सर्वाधिक संख्या आहे. मात्र, खांबे येथे एकही जनावर दगावल्याची नोंद नाही. रोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी जलद गतीने पावले उचलली जात आहेत.
दक्षता समिती गावोगाव जाऊन बाधित जनावरांची काळजी घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली. तालुक्यात १ लाख ७४ हजार ३५९ पशुधन संख्या आहे. ५ हजार ६५८ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात हि संख्या दुपटीने वाढली आहे. ४ हजार ३२४ जनावरे बरी झाली आहे. जनावरे बरी होण्याचे प्रमाण चांगले आहे. प्रतिबंध व जनावरांची काळजी हाच सर्वोत्तम उपाय असल्याने घाबरून नये. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत.
९ जिल्हा परिषद गटांमध्ये फिरती दक्षता पथके स्थापन करण्यात आले आहेत.बाधित जनावरांसाठी ड्रग बँका सुरु आहेत. मात्र, लम्पीचा फैलाव जनावरांमध्ये वेगाने होत असल्याने याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. अधिक नैसर्गिक आपत्तीने शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यात आता लम्पीची भर पडली आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.