आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अमृतवाहिनी चे ३८ विद्यार्थी एमपीएससी उत्तीर्ण

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने संपूर्ण देशात अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३८ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांची निवड ही संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील वर्षी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संस्थेच्या ट्रस्टी शरयु देशमुख ॲड. आर. बी. सोनवणे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मधुकर नवले, विलास वर्पे, रामहरी कातोरे, संतोष हासे, साखर कारखान्याचे एम. डी. जगन्नाथ घुगरकर, प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, विभाग प्रमुख डॉ. मधुकर वाकचौरे, आदी उपस्थित होते. यावेळी उत्तीर्ण ३८ विद्यार्थ्यांसह पालकांचा आमदार थोरात व डॉ तांबे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार थोरात म्हणाले, ग्रामीण भागातील अमृतवाहिनी संस्थेने आपल्या गुणवत्तेमुळे देशात लौकिक मिळवला आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशा विविध भागातून आलेले विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन आज देशात व विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. प्रशासनात अमृतवाहिनीतील ३८ विद्यार्थ्यांची निवड होणे हे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. अत्यंत कमी वयात आपण हे यश मिळवले असून या यशाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करा. आमदार डॉ. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हे शैक्षणिक हब झाले आहे. अमृतवाहिनी हा क्वालिटी शिक्षणाचा ब्रँड तयार झाला आहे. एमपीएससीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे संस्थेचे भूषण आहेत. व्यवस्थापक विवेक धुमाळ, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, एस.टी. देशमुख, डॉ. गुरव, प्रा. विजय वाघे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी गाढे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...