आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोल्हेगाव परिसर हा शहराचे उपनगर म्हणून विकसित होत आहे. या भागातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनमाड रस्ता (सावेडी) बोल्हेगाव ते निंबळक बायपासपर्यंतच्या सुमारे चार किमीच्या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ४ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरणासहित साडेपाच मीटरपर्यंतचे काम होणार आहे. तसेच, रस्ता दुरुस्तीसाठी पाच वर्षासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
बोल्हेगाव निंबळक बायपासपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदीसाठी व व्यवसायासाठी नगर शहरात येण्यासाठी दळणवळणाची सोय होत आहे. यातून शहराच्या बाजारपेठेत व्यावसायिकरण वाढण्यास मदत होईल. विविध कामांच्या माध्यमातून नगर शहर हे विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.