आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 4 तास आंदोलन:रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या रांगा; उपअभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील महात्मा फुले चौक ते बाजार समितीपर्य॔ंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली. याविरोधात शुक्रवारी (20 ऑगस्ट) दुपारी अकोल्यातील तालुका ग्राहक पंचायत व युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आला. या चार तास झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

रास्ता रोको आंदोलनातील आंदोलकांशी चर्चा करण्यास आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर अधिकारी उशिराने आले. याबाबत नागरिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर शनिवारपासून खडीकरणाचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. याबाबतचे निवेदन तहसीलदार सतीश थेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे यांनी स्वीकारले.

अकोले ते देवठाण मार्गाची दुर्दशा झाली. दोन दिवसांपूर्वी मनीषा पुंडे ही युवती दुचाकीवरून पडल्याने जखमी झाली. सध्या ती नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वीही खड्डेमय नादुरुस्त मार्गावर अनेक वाहनचालकांचे 28 अपघात झाले. त्यात अनेक महिलांसह नागरिकांना उपचारार्थ विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरीही याची दखल प्रशासनाकडून घेण्यात न आल्याने हे आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर आली. युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक व अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, तालुकाध्यक्ष सुरेश नवले, अ‍ॅड. बाळासाहेब वैद्य, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, रमेश राक्षे, रामदास पांडे, दिलीप वैद्य, भाऊराव नवले, दत्ता ताजणे, दिलीप शेणकर, दीपक शेटे, राम भांगरे, दत्ता शेणकर आदींनी आपल्या भाषणातून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शनिवारी या मार्गावर खडीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासित केले. या आंदोलनात राम गुंजाळ, वैभव सावंत, किरण चौधरी, राम रूद्रे, सुनील गिते, अनिल वैद्य, भाऊसाहेब वाळुंज, दत्ता बंदावणे, शिवाजी साबळे, रामदास सोनवणे, सुदिन माने, रमेश भांगरे, श्रीकांत भुजबळ, भानुदास भांगरे, सलमान शेख, अनिकेत गिते, शिवाजी गिर्‍हे, सुदाम भले, अमोल पवार, बाळासाहेब कासार, सुधीर कानवडे, दीपक मोरे आदी सहभागी होते.

यापुढे अधिकाऱ्यांना घेराव घालू

आंदोलनानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला. अकोले तालुक्यातील कामाचा दर्जा व गुणवत्ता नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक व भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...