आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:कार-ट्रॅव्हल्स धडकेत 4 ठार, मृतांमध्ये बीड, जालना, परभणीचे रहिवासी

करंजी (नगर)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सँट्रो कार व ट्रॅव्हल्सच्या समोरासमोर धडकेत चौघांचा मृत्यू झाला. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर करंजीजवळ रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पुण्याकडे जणारी सँट्रो व नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील केशव विलास बोऱ्हाडे (२५, मंठा, जालना), परमेश्वर लक्ष्मण काळे (४०, धामणगाव, परभणी), बाबासाहेब शंकर कदम (६०, जायगाव, बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद महादेव धावणे (२५, काेथरूड) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. हे सर्व सोयरिकीसाठी परभणीतील नातेवाइकांकडे गेले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser