आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसुली:नगर तालुक्यात 41 कोटी 11 लाख रुपयांची शासकीय वसुली, जिल्ह्यात सर्वात जास्त वसुली

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुक्यासाठी २०२१-२०२२ साठी शासकीय वसुलीचे एकूण ३९ कोटी ६० लाख एवढे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. नगर तहसील कार्यालयामार्फत या वर्षी एकूण ४१ कोटी ११ लाख ९५ हजार अशी विक्रमी वसुली करून जिल्ह्यात सर्वात जास्त वसुली केली आहे. जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर, तुकडेबंदी, नजराणा, विक्री परवानगी प्रकरणे, अंतर्गत लेखा परीक्षण, गौणखनिज वाहतूक व उत्खनन दंड, शासकीय कामातील स्वामित्वधन, विटभट्टी, मोबाइल टॉवर्स, खाणपट्टे, क्रशर इत्यादी गोष्टीतून वसुली करण्यात आली. नगर महानगर पालिका हद्दीतील अकृषक कर वसुलीचे अधिकार २१ जानेवारी २०२२ पासून प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात २५ ते ३० कोटी वसुली करून तालुक्याची टक्केवारी ११३ पर्यंत पोहोचली. प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार उमेश पाटील यांच्या नियोजनाखाली मंडळाधिकारी व तलाठी तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित बारवकर, महसूल सहायक प्रदीप आव्हाड, महसूल सहायक अशोक तांदळे या सर्वांनी विक्रमी वसुली पूर्ण करून शासनाच्या तिजोरीस हातभार लावला. तसेच सन मागील तीन वर्षांतही तालुक्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा दरवर्षी अधिकची वसुली केली.

बातम्या आणखी आहेत...