आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:राहत्या घरातून 41 तोळे सोने लंपास ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिस्तबाग चौक परिसरातील सुदर्शन हौसिंग सोसायटीत चोरट्यांनी राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तब्बल ४१.५० तोळे सोन्याचे दागिने व १० हजारांची रोख रक्कम लंपास केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत अरविंद गर्गे (वय ५५, सुदर्शन हौसींग, साईराम नगर, भिस्तबाग चौक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या नातीच्या नामकरणाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक घरी आले होते. शुक्रवारी रात्री उशिराने सगळे झोपले. शनिवारी सकाळी घरी काम करणारी सय्यद भाभी नेहमीप्रमाणे कामाकरीता आली असता घराचा किचनचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचे दिसले. तसेच किचनमध्ये ठेवलेल्या तीन ते चार बॅग घराच्या कम्पाउंडमध्ये पडलेल्या दिसल्या. घराची पाहणी केली असता किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बॅगमधील ४१.५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...