आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:एटीएम कार्ड बदलून 43 हजार लंपास

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हात चलाखीने एटीएम कार्ड बदलून खात्यातील ४३ हजार ३६० रूपयांची रक्कम काढून घेत एका नोकरदाराची फसवणूक केली. नगर-मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल शेजारी ही घटना घडली.

दिलीप दासराव चिरके (वय ५९ रा. सुभाषनगर ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...