आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नगर अर्बनकडे 450 कोटी शिल्लक

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन बँकेच्या दोन संचालकांनी बँकेच्या काही ठराविक ठेवीदारांना चौपाटी कारंजा शाखेत बोलावून त्यांच्याशी संवाद साधला व या संवादातून बँकेकडे सध्या ४५० कोटी रुपये शिल्लक असल्याचा गौप्यस्फोट झाल्याची चर्चा बँक वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, बँकेकडे ४५० कोटी रुपये शिल्लक असतील तर रिझर्व्ह बँकेची बंधने झुगारून, हे पैसे पाच लाखापुढील ठेवीदारांना तातडीने वाटप सुरू करा, असे आवाहन नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी सत्ताधारी संचालक मंडळाला केले आहे.

बँकेच्या दोन संचालकांनी काही ठेवीदारांशी चर्चा करून रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे इच्छा असूनही ठेवीदारांचे पैसे देता येत नसल्याचे सांगितल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, संचालकांनी बोगस कर्ज वाटताना रिझर्व्ह बँकेची भीती बाळगळी नाही. त्यामुळे आता ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत करायला रिझर्व्ह बँकेची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे.

संचालकांनी संवाद साधताना उपस्थित उपस्थित असलेल्या ठेवीदारांनी समितीशी संपर्क साधला व संचालकांनी सांगितलेले मुद्दे बरोबर आहेत का, याची विचारणा केली. आमच्याकडे ४५० कोटी रुपये शिल्लक आहेत.

परंतु रिझर्व्ह बँक बंधने उठवत नाही, म्हणून आम्हाला पैसे वाटता येत नाहीत, आमची वसुली खूप जोरात आहे व ठेवीदारांनी त्यांच्या ठेवीमधील काही हिस्सा बँकेच्या भागभांडवलात वर्ग करावा, अशा तीन मुख्य मुद्यांवर ते संचालक बोलत होते, असे त्या ठेवीदारांचे म्हणणे आहे. मात्र, बँकेकडे शिल्लक असल्याचा सांगितला जाणारा ४५० कोटी रुपयांचा आकडा ही भपारी वाटते, असा दावा गांधी यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...