आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी सहभाग:शनैश्वर विद्यालयातील रंगभरण स्पर्धेत 450 विद्यार्थ्यांचा सहभाग

सोनई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगणेश उत्सवानिमित्त सोनई व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून युवा मंच सोनई व पसायदान आनंदवन सोनई यांच्या वतीने शनैश्वर विद्यालय सोनई येथे रंगभरण चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

उदयन गडाख यांच्या हस्ते विद्यार्थांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये लहान गट (पाचवी ते सातवी) प्रथम कार्तिकी गडाख, द्वितीय तेजल भांड, तृतीय वेदिका शिंदे, उत्तेजनार्थ श्रावणी निमसे, सिद्धी जंगले, नजर कार्तिकी व मोठा गट (आठवी ते दहावी) प्रथम आदिती कचरे, द्वितीय वैष्णवी खांदे, तृतीय शिवानी मुंगसे, उत्तेजनार्थ प्रणिता काकडे, प्रतिभा आदमने यांनी यश मिळवले. याप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक कारभारी डफाळ, संस्थेचे विश्वस्त उदयराव पालवे, प्राचार्य भीमराज खोसे, प्राचार्य उर्मिला कदम, संजय गर्जे, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य भीमराज खोसे यांनी केले आभार प्रा. किशोर मुंगसे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा बी. एस. दरंदले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...