आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकतेच अहमदनगर एमआयडीसी येथील एपिटोम कंपोनन्ट्स प्रा. लि., क्लासिक व्हिल्स लि. व हरिहर इंडस्ट्रिज या कंपन्यांद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक आणि व्यक्तिगत मुलाखती घेऊन कंपनीतर्फे ४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
पारनेर तालुक्यातील सुपा येथे येऊ घातलेल्या बहुराष्ट्रिय जपान कंपन्यांच्या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना तयार करुन घेतले जात आहे व अशा प्रकारे अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील अनेक संधी भविष्यात निर्माण होतील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी दिली. कॉलेजच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलद्वारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्यासाठी सतत वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि याचाच आम्हाला फायदा झाला असे मनोगत प्लेसमेंट मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी, सर्व विभागांचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे व खजिनदार विवेक भापकर व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.