आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून अहवालच नाही:दहा दिवसांत लंपीमुळे 473 मृत्यू

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपीचा फैलाव अद्याप कमी झाला नाही. जिल्ह्यात दहा दिवसांत तब्बल ४७३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांपासून पशुसंवर्धन विभागाकडून अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नाही. मृत्युचे प्रमाण दररोज सरासरी ५० वर असून आतापर्यंत तब्बल ३ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यु झाला आहे.

लंपी हा जनावरांमध्ये आढळून येणारा त्वचारोग आहे. या रोगाच्या संसर्गामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येऊन फुटतात, तसेच ज्वर वाढतो. तत्काळ उपचार मिळाला नाही, तर जनावण्याची शक्यता आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लंपी नियंत्रणासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवले आहेत, जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. जिल्हाभर स्वच्छ गोठा मोहिम राबवण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरही सूचना दिल्या आहेत. तथापि, लंपी अद्याप नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले नाही.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दररोज लंपी बाधीत जनावरांचा अहवाल जाहीर केला जातो. परंतु, मागील दोन दिवसांपासून अहवाल जारी करण्यात आलेला नाही. २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल ४७३ जनावरांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला. दररोज सुमारे ५० जनावरांचा लंपीमुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ३ हजार ४१ हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर ३४ हजार ६१५ जनावरे बरी झाल्याची दिलासादायक माहिती आहे.

दररोज ७०० जनावरांना होतेय लंपीची बाधा
जिल्ह्यात लंपीचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज सुमारे ६०० ते ७०० जनावरांना नव्याने बाधा होत आहे. २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दहा दिवसांत ६ हजार २६४ जनावरे बाधित झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे. आतापर्यंत बाधित जनावरांचा आकडा ४४ हजार ५०० वर पोहोचला आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
लंपी नियंत्रणासाठी गोठ्याची स्वच्छता महत्वाची आहे. यासाठी गोठा व परिसरात सोडियम हाईपोक्लोराईडची फवारणी करावी. गोठा स्वच्छ ठेऊन माशा नियंत्रणात आणणे आवश्यक आहेत. जनावरांची वाहतूक टाळावी. लक्षण आढळल्यास तत्काळ पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.'' डॉ. अशोक ठवाळ, पशुधन विकास अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...