आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​पर्यावरण पुरक:प्रदुषण विरहित इंधनासाठी होणार 474 बायोगॅस संयत्रांची उभारणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापरासाठी प्रदुषण विरहित इंधन म्हणून उपयुक्त असलेल्या बायोगॅस संयत्र उभारणीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आखले आहे. वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन आखले असून त्यासाठी प्रवर्गनिहाय आकाराप्रमाणे ९ हजार ८०० ते ७० हजार ४०० रूपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला शासनाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०२२-२०२३ या कालावधीत ४७४ बायोगॅस संयत्र उभारणीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यात २ ते २५ घनमिटर बायोगॅसला अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गात एक घनमिटरसाठी ९ हजार ८०० तर २० ते २५ घनमिटर बायोगॅससाठी ५२ हजार ८०० अनुदान दिले जाणार आहे. तर अनुसुचित जाती व जमातीसाठी एक घनमिटरसाठी १७ हजार तर २० ते २५ घनमिटरसाठी ७० हजार ४०० अनुदान दिले जाणार आहे. संयत्राला शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त १ हजार ६०० रूपये अनुदान दिले जाणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लाभार्थी व गवंड्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना biogas.mnre.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लाभार्थ्याच्या नावार आठ अ खाते उतारा आवश्यक आहे. आधारकार्ड, पशुधन असल्याचा दाखला, ग्रामसेवक रहिवासी दाखला, संयत्र बांधकामासाठी जागा व आधारलिंक पासबुकची प्रत जोडून पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, तालुकास्तरावर कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), कृषीविकास अदिकाऱ्यांना संपर्क साधावा लागेल, असे आवाहन अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

बायोगॅसचा फायदा काय ?
बायोगॅस हा घरगुती इंधन म्हणून वापरता येणार आहे, तसेच त्यावर विद्युत दिवाही लावता येतो. इंधनाबरोबरच चांगल्या प्रतिचे शेंद्रीय खत तयार होते, त्यामुळे रासायनिक खताची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. धुरामुळे होणारा त्रासही कमी होतो, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...