आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबद्ध‎:संत निरंकारी मंडळाच्या सामुहिक‎ सोहळ्यात 48 जोडपी विवाहबद्ध‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन (औरंगाबाद) येथे झालेल्या ५६ व्या‎ वार्षिक निरंकारी संत समागम सोहळ्याची सांगता‎ झाल्यानंतर कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी सद्गुरु माता‎ सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या‎ पावन सान्निध्यात झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४८‎ जोडपी विवाहबद्ध झाली. विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी‎ मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि प्रत्येक‎ जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ (सांझा हार) घालून‎ करण्यात आला.

त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र‎ मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे‎ (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या‎ शेवटी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी, तसेच‎ विवाहासाठी आलेले नवदाम्पत्यांचे नातलग व उपस्थित‎ भाविकांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव केला.‎

बातम्या आणखी आहेत...