आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी शासन दरबारी सुरू केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले. मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली. तसा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून जारी करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील ३० गावांसाठी निधी मंजूर करण्यात आला.
यामध्ये कोकणगाव येथे दशक्रिया विधी ओटा बांधणे, चांदे बुद्रूक येथे संत सावतामाळी मंदिर सभामंडप बांधणे, खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण, थेटेवाडी येथे स्मशानभूमी, रवळगाव येथे स्मशानभूमी सुशोभीकरण काँक्रिटीकरण, चिंचोली रमजान येथे माळेवाडी येथील काळुबाई मंदिर सभामंडप बांधणे, कौडाणे येथे रस्ता काँक्रिटीकरण, ताजू येथे घोड कालव्यावर पूल बांधणे, करमणवाडी येथे पावणेवस्ती येथे अंगणवाडी, आखोणी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण, मलठण येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे, शेगुड येथे काँक्रीटीकरण, सीतपूर येथे काँक्रीटीकरण, जळगाव येथे भैरवनाथ मंदिर काँक्रीटीकरण, नागलवाडी येथे नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण, निंबोडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण, तरडगाव येथे सभामंडप बांधणे, कुंभेफळ येथे हनुमान मंदिर ते राजेश दोधाड वस्ती सिमेंट काँक्रीटीकरण या गावांना प्रत्येकी दहा लाख रुपये, धांडेवाडी येथे बबन धांडे ते नलवडे वस्ती सिमेंट काँक्रीटीकरण २० लाख रुपये, आळसुंदे येथे गावठाणमध्ये काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपये, वडगाव तनपुरा येथे भिवाई मंदिरासमोर काँक्रिटीकरण, सुपा येथे काँक्रीटीकरण, खंडाळा येथे काँक्रीटीकरण, पठारवाडी येथे काँक्रीटीकरण, शिंदेवाडी काँक्रीटीकरण, भांबोरा येथे लक्ष्मीआई मंदिर सभामंडप बांधणे या कामांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये, बारडगाव सुद्रिक येथे चौक सुशोभीकरण २५ लाख रुपये, नवसरवाडी येथे काँक्रीटीकरण १० लाख रुपये, खातगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लाख रुपये, बेनवडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.
जामखेड तालुक्यातील १५ गावांतील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये अरणगाव रस्ता काँक्रिटीकरण, डिसलेवाडी येथे मारुती मंदिर सभामंडप, जवळा येथे गोयकरवाडी येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे, कुसडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण, नागोबाचीवाडी मुंगेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरसमोर सभामंडप बांधणे, पिंपळगाव आळवा येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण, चोभेवाडी येथे स्मशानभूमी संरक्षित भिंत बांधणे, तरडगाव येथे वंजारवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण, शिऊर येथे श्रीभैरवनाथ मंदिर परिसर काँक्रीटीकरण, राजुरी येथे रस्ता काँक्रीटीकरण, हाळगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण, नाहुली येथे श्रीम्हसोबा मंदिर सभामंडप बांधणे, नायगाव येथे म्हसोबा मंदिर समोर काँक्रीटीकरण, सातेफळ येथे जि. प. प्रा. शाळा खोली बांधणे, तरडगाव येथे जि. प. प्रा. शाळा खोली बांधणे या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
कर्जतमधील ३०, तर जामखेडमधील १५ गावांना निधी गावांतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मुलभूत सुविधांच्या कामांचे विविध प्रस्ताव आमदार प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. या कामांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरी मिळाली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४५ गावांमधील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली. आमदार शिंदे यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले. कर्जतमधील ३०, तर जामखेडमधील पंधरा गावांना निधी मंजूर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.