आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

अहमदनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे पहाटे 2च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मयत जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बसला औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले, परंतु सर्व पाचही जण उपचारापूर्वीच मयत झाले असून पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...