आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरात बेकायदा वृक्षतोड केल्यास प्रति वृक्ष ५० हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने घेतला आहे. आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा होऊन प्राचीन वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
पर्यावरण विभागाने महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम कायद्यात सुधारणा करुन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेकायदा वृक्ष तोड केल्यास जास्तीत जास्त १ लाखापर्यंत दंड केला जाणार आहे. बेकायदा वृक्षतोड झाल्यास ७ वर्ष वयाच्या पुढील प्रति वृक्षासाठी ५० हजार दंड आकारावा असा निर्णय झाला आहे. सुधारीत कायद्यानुसार ५० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे प्राचीन वृक्ष (हेरिटेज ट्री) तोडण्याची परवाणगी दिली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीनुसार वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्यास त्याबदल्यात नुकसान भरपाई म्हणून तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी झाडे लावून ७ वर्षापर्यंत संगोपन करणे बंधनकारक राहील. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने दर पाच वर्षाने किमान एकदा वृक्ष गणना करावी. वृक्ष कर हा वृक्ष लागवड व संगोपनासाठीच खर्च करावा. या वर्षी पावसाळ्यात नगरमध्ये विकासकाकडून मोठ्या उंचीचे ५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजनही करण्यात आल्याचे समिती सचिव शशिकांत नजान यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.