आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नगर शहरात बुधवारी (१ मार्च) सकाळी ७ ते १० दरम्यान महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात कॉलेज युवक, महानपालिका कर्मचारी, इतर संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे एक हजार श्री सदस्यांनी एकूण ५४ टन कचरा गोळा केला. शहरातील डीएसपी चौकातून महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. मनपाचे सामान्य प्रशासन उपायुक्त श्रीनिवास कुरे, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब मरकड, नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, सहायक फौजदार एस. एम. अडसूळ आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानासाठी आवश्यक कुदळ, खोरे, घमेले, खराटा हातात घेऊन श्री सदस्यांनी स्वच्छता केली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा बॅनर व मास्क व हॅण्ड ग्लोज घातलेले श्री सदस्य सर्वांचे आकर्षण ठरले. महास्वच्छता अभियानाचा समारोप पुणे एसटी स्टँड प्रांगणात करण्यात आला. या वेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त पंकज जावळे, राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, तारकपूर एसटी डेपोचे आगार व्यवस्थापक अभिजीत आघाव, एटीएस विठ्ठल कंगारकर, डीटीओ अनिल भिसे, यंत्र अभियंता मुकुंद नगराळे, वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे, नगरसेवक बाळासाहेब बोऱ्हाटे, नगरसेवक विजय पठारे, नगरसेवक अमोल येवले, पुणे एसटी स्टँडचे वाहतूक नियंत्रक अतुल लोंढे आदी उपस्थित होते. उपस्थितांचा धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या व्यापक व गिनिज बुकात नोंद झालेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य समाज उद्धारासाठी असल्याचे गौरवोदगार काढले.
घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ५१ खेपा
नगर शहरातील विविध परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने एकाग्र होऊन सुमारे एक हजार श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामध्ये महापालिकेचे सुमारे २५० कर्मचारी, आम आदमी पार्टीचे ५० कार्यकर्ते, इंजिनिअरिंग कॉलेज, तसेच एनसीसी विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, असे एकूण ४६० जणांनी महास्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. महापालिकेच्या वतीने कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी, ट्रॅक्टरद्वारे ५१ खेपा करण्यात आल्या. या मोहिमेत तब्बल ५४ टन कचरा गोळा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.